भाजपा चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्ष पदी देवराव भोंगळे तर महानगर अध्‍यक्षपदी डॉ. मंगेश गुलवाडे यांची निवड

0
132
Advertisements

चंद्रपूर – भारतीय जनता पार्टीच्‍या चंद्रपूर जिल्‍हा (ग्रामीण) अध्‍यक्षपदी देवराव भोंगळे यांची तर चंद्रपूर महानगर अध्‍यक्षपदी डॉ. मंगेश गुलवाडे यांची निवड करण्‍यात आली आहे. भाजपाचे महाराष्‍ट्र प्रदेश अध्‍यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आज दिनांक 3 जुलै रोजी या नियुक्‍तीची घोषणा केली आहे.

भाजपाचे नवनियुक्‍त जिल्‍हाध्‍यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे हे चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष आहे. 2000 ते 2005 या कालावधीत घुग्‍गुस ग्राम पंचायतीचे सरपंच पद त्‍यांनी भूषविले. सर्वात कमी वयाचे सरपंच म्‍हणून त्‍यांनी काम केले. 2007 मध्‍ये चंद्रपूर पंचायत समितीचे सदस्‍य म्‍हणून जिल्‍हयात सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले. 14 मार्च 2007 ते 18 नोव्‍हेंबर 2009 या कालावधीत त्‍यांनी चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती म्‍हणून कार्यभार सांभाळला. 2012 मध्‍ये ते जिल्‍हा परिषद सदस्‍य म्‍हणून घुग्‍गुस जि.प. क्षेत्रातून ते निवडून आले. त्‍यानंतर 2014 मध्‍ये जिल्‍हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती म्‍हणून त्‍यांनी कार्यभार सांभाळला. चंद्रपूर जिल्‍हा भाजपाचे सरचिटणीस पदही त्‍यांनी भूषविले. चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष म्‍हणून चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागाच्‍या विकासात त्‍यांनी महत्‍वपूर्ण योगदान दिले आहे. चंद्रपूर जिल्‍हा भाजपा (ग्रामीण) अध्‍यक्ष म्‍हणून जिल्‍हयात भाजपाचे संघटन अधिक बळकट करत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात हा जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अधिक अग्रेसर करू व जिल्‍हयात भाजपा कायम प्रथम क्रमांकाचा पक्ष राहील यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करू, असे देवराव भोंगळे यांनी म्‍हटले आहे.

Advertisements

चंद्रपूर महानगर भाजपा अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे हे चंद्रपूरातील प्रसिध्‍द वैद्यक व्‍यवसायी आहे. इंडियन मेडीकल असोसिएशन चंद्रपूरचे सहसचिव, सचिव तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन महाराष्‍ट्र चे सह‍सचिव आदी पदे त्‍यांनी भूषविली आहे. वैद्यकिय व्‍यवसायाचा व्‍याप सांभाळत पक्षसंघटनेसाठी वेळ देत त्‍यांनी भाजपाचे संघटन बळकट करण्‍यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. कोरोना महामारीच्‍या भाजपातर्फे गरीब व गरजू नागरिकांसाठी राबविण्‍यात आलेल्‍या सेवाकार्य मोहीमेत त्‍यांनी महत्‍वपूर्ण योगदान दिले आहे. चंद्रपूर महानगरात भाजपाचे संघटनकार्य अधिक बळकट करण्‍यावर आपला विशेष भर राहणार असून महानगरात भाजपा हा कायम अव्‍वल क्रमांकावर राहील यासाठी पक्षनेतृत्‍वाच्‍या मार्गदर्शनात आपण सक्रीयपणे काम करणार असल्‍याचे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्‍हटले आहे.

श्री. देवराव भोंगळे आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या निवडीबद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, संजय गजपूरे, सौ. रेणुका दुधे, ब्रिजभूषण पाझारे, जि.प. अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपाध्‍यक्षा सौ. रेखा कारेकार, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे , गजानन गोरंटीवार, अलका आत्राम , काशी सिंह , रत्नमाला भोयर , नंदू रणदिवे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here