प्रकाशनगर येथील अंधार कधी दूर होणार? गोगुलवार यांच्या नेतृत्वात आयुक्तांना समस्यांचे दिले निवेदन

0
55
Advertisements

चंद्रपूर – शहरातील महाकाली प्रभागातील प्रकाश नगर ला मागील एक ते दिढ वर्षांपासून विजेचे खांब बसविण्यात आले होते परंतु त्या खांबावर अजूनपर्यंत स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले नाही, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास त्रास सहन करावा लागत आहे.

प्रकाश नगर येथे जवळपास 100 ते 150 घर आहे, पावसाचे दिवस सुरू झाल्याने आता सर्पदंश व रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

यासाठी बहुजन समाज पक्षाचे शहरअध्यक्ष शिरीज गोगुलवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना या समस्यां तात्काळ सोडविण्यात यावा यासाठी निवेदन दिले.

यावेळी सागर वरघन, प्रीतम बोबडे, यांची उपस्थिति होती

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here