गडचांदूरातील महामार्ग दुरुस्तीचा दर्जा निकृष्ठ, सभापती विक्रम येरणे यांची संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार

0
51
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
औद्योगिक नगरीच्या नावाने प्रसिद्धी प्राप्त कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातून जाणारा राजूरा-गोविंदपूर महामार्गाचे रुंदीकरण 3 वर्षापूर्वी सिआरएफ अंतर्गत करण्यात आले.परंतु या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून रस्त्याचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहे.याठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणात अडथळा निर्माण झाला असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.एनएचएआय मानका प्रमाणे सदर मार्ग बनवावा अशी मागणी गडचांदूर नगरपरिषद गटनेता तथा बांधकाम सभापती विक्रम येरणे यांनी उपविभागीय अभियंता एनएचएआय चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सदर काम हे सुरुवातीलाच निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार येरणे यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांकडे केली होती.मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करून रस्ता पुर्ण करण्यात आला आणि महिन्याभरातच यावर ठीकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले.तत्कालीन ठेकेदाराने दुरुस्तीच्या नावाखाली केवळ लिपापोती करत करत 2 वर्ष चाल ढकल करीत काढल्याचा आरोप येरणे यांनी निवेदनातून केला आहे.दरम्यान सदर मार्ग हा एनएचएआय ला हस्तांतरीत झाला.सध्या गडचांदूर शहरातून जाणारा सदर हायवे रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरु आहे.परंतु हे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून खडीकरण झालेले काम अवघ्या दोन-तीन दिवसातच खराब झाल्याचे पहायला मिळत आहे.पुढे यावर मजबुतीकरण व डांबरीकरण होणे बाकी आहे.नियमानुसार खालचा तळ मजबूत नसेल तर त्या रस्त्यावर खड्डे पडतात त्यामुळे हल्ली सुरू असलेल्या कामाची मोक्का चौकशी करून पुढे होणारे काम एनएचएआय च्या मानका प्रमाणेच करावे.पुढे जर रस्त्यावर खड्डे पडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा येरणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here