मनात होता चोरीचा बेत झाला खून, खुनाच्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक, 60 वर्षीय महिलेचे हत्या प्रकरण

0
104
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील महात्मा गांधी शाळेच्या मागील भागात वास्तव्यास असणारी सौ.लंकाबाई नीलकंठ मेश्राम वय 60 वर्षे महिलेचे त्याच्या राहत्या घरी प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली असून सदर महिला येथील वार्ड क्रमांक 4,महात्मा गांधी शाळेच्या मागे जिल्हापरिषद शाळेजवळ गेल्या कित्येक दिवसांपासून एकटीच राहत होती.पती नीलकंठ मारोती मेश्राम वयवर्ष 72 हा तीचापासून वेगळा राहत होता.महिलेच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि सदर महिला दोन-तीन दिवसापासून कुणालाही दिसली नव्हती.घरातून सडका वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांना प्रकरण संशयास्पद वाटू लागले.घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी लगेच घटनास्थळी गाठून महिलेच्या पतीला बोलावले आणि उपस्थीत नागरिकांसमोर घराचे दार उघडले तर समोर महिलेचा मृतदेह पडलेला दिसून आला.हे दृश्य पाहून उपस्थीत अक्षरशः चकित झाले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होते.पलंगावर रक्त सांडले होते.सदर बाबी लक्षात घेता महिलेची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता.मृत्तदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.शवविच्छेदनानंतर महिलेच्या डोक्यावर माराच्या गंभीर जखमा असल्याचे सांगण्यात आले.प्रकरण गंभीर असल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी 3 विशेष तपास पथक तयार करून रवाना केले.गोपनीय माहितीच्या आधारे गडचांदूर वार्ड क्रमांक 4 येथील अब्दुल खलील अब्दुल रशीद शेख वयवर्ष 22 याला 2 जुलैच्या रात्री संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मृतक महिलेच्या घरी चोरी करण्याचा उद्देशाने जावून मृतक हिच्या डोक्यावर दगडी पाटा,विट,भांड्याने मारून ठार केल्याची कबुली दिली.सदर आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्ह्यचा तपास चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक,गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती पोलिस स्टाफ सपोनि प्रमोद शिंदे,पोउपनि चौधरी,शुभांगी ढगे,नापोशि धर्मराज मुंडे,जगदीश झाडे,रोहीत चिलगिरे करीत आहे.अवघ्या 24 तासांच्या आत खुनाच्या आरोपीला अटक केल्याबद्दल गडचांदूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here