चारचाकी वाहनांचा अपघात, पोलिसांनी केली चौकशी वाहनात मिळाली अवैध दारू, 2 आरोपिंना अटक

0
126
Advertisements

चिमूर –  दि.2/7/2020 रोजी सकाळी 02/00 वा.दरम्यान वरोरा ते चिमूर रोडने देशी दारूच्या मुद्देमालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने तस्करांवर चिमूर पोलीस पाळत ठेऊन असताना एक पांढऱ्या रंगाचे वाहन शेंडेगाव येथील आठवले कॉलेज जवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता शेवरलेत कंपनीची वाहन क्र MH 31 CR 8728 मध्ये आरोपी 1) रिझवान अब्दुल बशीर रा. नागपूर , 2) कुणाल नागोराव हांडे रा. हिंगणघाट जी. वर्धा हे जखमी अवस्थेत अपघातग्रस्त वाहनात अडकून असल्याचे दिसून आल्याने शेंडेगाव येथील गावकऱ्यांचे मदतीने त्यांना तात्काळ अंबुलन्सने रुग्णालय चिमूर येथे उपचार कामी पाठवून वाहनात असलेला देशी दारूचा मुद्देमाल असा एकूण 4,59,400 रु चा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपितांवर कलम 279,337,338,269,271,188 भांदवी सह कलम 65अ,83 मदाका , 51 ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा , कलम 3 साथीचा रोग प्रतिबंधक कायदा व 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाही मा. श्री. अनुप तारे , उप विभागीय पोलीस अधिकारी मूल अति.कार्यभार चिमूर , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पोउपनी अलीम शेख, पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे, पोशी सतीश झिलपे, अवधूत खोब्रागडे, चापोशी विजय उपरे व शेंडेगाव येथील गावकरी मंडळी यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here