वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे….! ▶️कोरपना पोलिस स्टेशन, ग्रा.रुग्णालय, विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण

0
31
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे” या म्हणीप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात 1 जुलै रोजी ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.कोरपना येथे सुद्धा स्थानिक ग्रामीण रुग्णालय,पोलिस स्टेशन व शासकीय विश्रामगृह परिसरात भाजपच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भाजपाचे जिल्हा महामंत्री राहूल सराफ यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उदघाटक केले.अध्यक्षस्थानी हिरामन खोबरागडे जि.महा.हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कोरपना तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगावचे उपसरपंच नारायण हिवरकर,सं.गां.नि.यो.चे माजी तालुकाध्यक्ष संजय मुसळे,नत्थू ढवस,कवडू जरीले,डॉ.पुरी,पोलिस कर्मचारी राठोड व हेमंत धवणे तसेच चौधरी,राठोड मॅडम सह इतरांची उपस्थीती होती.वृक्षारोपणाच्या निमित्त साधून उपस्थीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण हिवकर,आभार संजय मुसळे यांनी व्यक्त केले.यावेळी भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here