फी च्या नावाने पालकांना त्रास देऊ नका, संस्था चालकांनो माणुसकी दाखवा अन्यथा गाठ आमचे सोबत – युवा सेना, चंद्रपूर

0
28
Advertisements

चंद्रपूर – कोरोनामुळे राज्यात आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत असताना शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये याकरिता संस्थाचालकाने फी भरण्याकरिता पालकांना वेळ द्यावा अशे राज्यशासनाने, शिक्षण विभागाने आदेश दिले असताना सुद्धा चंद्रपूर शहरातील काही संस्थाचालक माणुसकी विसरून त्रास द्यायचे काम सुरु केलेले आहेत. बऱ्याच शाळा विशेतः कॉन्व्हेंटस नी ऑनलाईन माध्यमातून शिकवणी द्वारे शिक्षण देणे सुरु केलेले आहेत तर यामध्ये काही फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवत आहे आणि त्यांना ऑनलाईन कलासेस ग्रुप च्या बाहेर काढून शिक्षणा पासून दूर करीत आहे अश्या बऱ्याच गोष्टी आमच्याकडे येत आहेत यामुळे विद्यार्थ्यांना मानसिकरीत्या खच्चीकरण होत असून त्याना बाकीं वर्गातील विद्यार्थी पेक्षा आपण कमी आहोंत, गरीब आहोंत अश्या प्रकारच्या विचाराने त्यांची मनस्थिती होत असून येणाऱ्या काळात याचे वाईट दुष्परिणाम होऊ शकेल याची शक्यता नाकारता येणार नाही आणि असं झाल्यास यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक जबाबदार राहील.

ज्या पालकांना फी भरणे शक्य आहे अशांनी फी भरून शाळा,कॉन्व्हेंट महाविद्यालय यांना सुद्धा आपलं सहकार्य करावे विनाकारण शक्य असून यांबद्दल जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करणे हि चुकीचे आहे. या सोबतच काही संस्थाचालक नोट बुक्स, पुस्तके, कपडे आपल्याच संस्थेकडून घेण्यास दबाव करीत आहे ज्याची किंमत बाजार किमतीपेक्षा हि जास्त असून पैसा कमवायचा लालसेपोटी गरीब मध्यमवर्गी पालकांना,विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम करीत आहे. यासंबंधी आधीच शिक्षणाधिकारी साहेब यांना निवेदन हि देण्यात आलेले असूनहि हा प्रकार सुरु आहेत.त्यामुळे त्यांनीही संबंधित विषयावर लक्ष घालावे,पुन्हा एकदा भेट घेऊन याबद्दल चर्चा करून शेवटची विनंती करण्यात येईल. संस्थाचालकांनी थोडी माणुसकी ठेऊन पैसे भरण्याकरिता पालकांना मुभा देऊन विद्यार्थी हित जोपासून मदत करावी आणि शिक्षणासारख्या या पवित्र क्षेत्राला डाग लावण्याचे प्रकार यापुढे त्वरित बंद करावे अन्यथा युवासेना,शिवसेना आपल्या पद्धतीने चांगला धडा शिकवेल, विध्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधी कुठल्याही प्रकारची समस्या असल्यास युवासेना खपवून घेणार नाही असे आव्हान युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश र. बेलखेडे यांनी केलेले आहे. लवकरचं अश्या संस्थेवर पुरावे जमा करून कारवाही मोहीम युवासेना मार्फत करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here