वृक्षलागवड काळाची गरज…..! ▶️गडचांदूरात भाजपचे जिल्हा महामंत्री सराफ यांच्या हस्ते वृक्षारोपण

0
21
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्र हिरवेगार बनवण्याचे स्वप्न मागील सरकारने बघीतले आणि 50 कोटी वृक्षलागवड करून साकारही केले.वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी झाडांची अत्यंत गरज असून यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे.याच धर्तीवर यंदा आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्ह्याचे माजी पालक मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थीतीत वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडत असून याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे भाजपाचे जिल्हा महामंत्री राहूल सराफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जिल्हा महामंत्री हिरामन खोब्रागडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सेलोकर,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,अँड.दिपांजली मंथनकर,माजी नगरपरिषद अध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,महेश शर्मा,रोहन काकडे,संदीप शेरकी,सौ.रंजना मडावी,सौ.निता क्षीरसागर, सौ.संगीता गोरडवार,हरीभाऊ मोरे,मधूकर कोवळे,निलेव ताजने,चंद्रकांत शिंगरू,गजानन चिरडे,हरीश घोरे,महादेव एकरे,भालेराव सर,मेहताब शेख सर,इमरान शेख,वैभव राव,गणपत बुरडकर,आशीष तिवारी,योगेंद्र केवट, रामचंद्र वासाडे इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here