वरोरा – देशात कोरोना विषाणूचा हाहाकार माजला असताना शासनाने हा विषाणू पसरू नये यासाठी नियमावली तयार केली आहे.
राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व 144 कलम लागू केली असल्याने लग्न समारंभ साठी फक्त 50 नागरिकांना परवानगी , 5 च्या वर नागरिकांनी एकत्र येता कामा नये, असे विभिन्न नियम लागू केले आहे.
परंतु काही नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून या विषाणूला खुले आमंत्रण देत आहे.
अशीच एक घटना वरोरा तालुक्यात घडली, तालुक्यात मेटपल्लीवार परिवाराचा विवाह समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता परंतु या कार्यक्रमाची कसलीही परवानगी त्यांनी घेतली नव्हती, या सर्व परिस्थितीचे वृत्तांकनसाठी गेलेले पत्रकार राजन हिरे यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली असता मेटपल्लीवार कुटुंबातील काही सदस्य हिरे यांचेवर चिडून जाऊन त्यांना मारहाण केली.
गर्दी, मास्क व सोशल डिस्टनसिंग याचा संपूर्ण फज्जा मेटपल्लीवार कुटुंबांनी उडविला त्याबद्दल वृत्तांकन केल्याने जर पत्रकाराला अश्या प्रकारे कुणी मारहाण करीत असतील तर पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांचे धाडस वाढत जाणार.
वरोरा पोलिसांनी पत्रकार हिरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीना तात्काळ अटक केली व त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला.
ह्या गुन्ह्यात पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायदा लावण्यात यावा यासाठी ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, तालुका सचिव सुनील शिरसाट आदींनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत निवेदन दिले.
लग्न समारंभात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला मारहाण, पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार
Advertisements