गोंडपीपरी येथे पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

0
185
Advertisements

गोंडपिपरी – वेदांत मेहरकुळे

कोरोना या वैश्विक महामारी संकटात करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल इंधनाच्या सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून केंद्र शासनाच्या या अन्यायकारक धोरणाचा विरोध म्हणून संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाचे वतीने धरणे देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज गोंडपिपरी येथील तहसील कार्यालयासमोर क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे, कृउबा समिती सभापती सुरेश चौधरी, तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, राजीव सिंह चंदेल, देविदास सातपुते, नगराध्यक्ष सपना सा कलवार, वासुदेव सातपुते, देवेंद्र बट्टे , रफिक शेख, श्रीनिवास कंदनुरी वार , अनिल झाडे, साईनाथ कोडापे, महादेव चौथले,असलम शेख, सादिक शेख, गौतम झाडे, नामदेव सांगळे, विनोद नागापुरे बालाजी चनकापुरे, नगरसेवक प्रदीप झाडे, प्रवीण नरहर शेट्टी वार, लता हुलके, संगीता कुळमेथे, वनिता वाघाडे, शीला बांगरे, बबलू कुळमेथे, वासुदेव नगारे, संतोष बंडावार ,गौरव वासेकर, भारत बोरकुटे, शैलेश सिंह बैस, नितीन धानोरकर, नितीन मेश्राम आ दीं प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेत्र आमदार सुभाष धोटे यांनी केंद्र सरकारच्या जनसामान्य प्रति अंगिकारलेल्या अन्यायकारक धोरणाचा विरोध करत टाळेबंदी च्या पार्श्वभूमी तही लोकांचा रोजगार गेला असताना केंद्र सरकार मात्र जीएसटी व अन्य विविध कर जनसामान्यांवर लादून गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्याचे कार्य करत असल्याचे घणाघाती आरोप त्यांनी केला. तसेच काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेले धरणे आंदोलनाचे निवेदन हे थेट देशाचे महामहीम राष्ट्रपती यांचे पर्यंत पोहोचवून केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध नोंदवित असल्याचेही आमदार सुभाष धोटे म्हणाले.
धरणे आंदोलनाचे सूत्रसंचालन गौतम झाडे व सचिन फुलझेले यांनी , प्रास्ताविक तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे तर आभार नामदेव सांगळे यांनी मानले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मास्क घालून सोशल डिस्टंसिंग ठेवत धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले. तसेच अनेक मान्यवरांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here