Advertisements
चंद्रपूर:- शहरातील वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृह मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ पसरली आहे, सकाळी मॉर्निंग वाक करायला निघालेल्या नागरिकांना गळफास घेऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसतातचं नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहीती दिली. माहिती मिळताच पप्पू देशमुख यांनी पोलिसांना माहिती देत घटनास्थळी पोहचले, रक्षित मेश्राम वय (45) असे मृतकाच नाव असून तो खाजगी सेकृटी गार्ड होता व या परिसरात गेल्या 11 महिन्या पासून किरायाने रहात होता. घरगुती वादातून आत्महत्या केल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचून पंचनामा केला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.