सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांवर लावलेले गुन्हे परत घ्या – शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची मागणी

0
78
Advertisements

चंद्रपूर – वर्ष 2019 ला राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे साऊंड लावायचा की नाही यावर प्रचंड पेच निर्माण झाला होता, त्यावेळेस गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली होती.
परंतु राजकीय दबावापोटी चंद्रपूर जिल्ह्यात तत्कालीन भाजप सरकारने 2 साऊंड सिस्टम वाजविण्याची मौखिक परवानगी दिली.
आता मिरवणुकीत डीजे वाजणार म्हटल्यावर गणेश मंडळांनी त्या प्रकारची तैयारी करीत डीजे सिस्टम लावला.
आज तब्बल वर्षभरानंतर चंद्रपूर गणेश मंडळ भक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे, गणेश मंडळातील सदस्य यावर चांगलेच नाराज झाले आहे.
आधी मौखिक परवानगी द्यायची आणि नंतर गुन्हे दाखल करायचे हा काय प्रकार आहे असे प्रश्न आज गणेश भक्त विचारत आहे.
सर्वात मोठी अडचण महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली आहे कारण हे विद्यार्थी सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी आहे, आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर आपल्या शैक्षणिक भविष्याचं काय होणार यावर आता युवकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घडत असलेल्या या संपूर्ण प्रकारावर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे गणेश भक्तांच्या मदतीला समोर आले आहे.
गणेश भक्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
2 बॉक्स वाजविण्याची परवानगी खुद्द तत्कालीन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी गणेश मंडळाना दिली होती, मग हे गुन्हे दाखल करण्याचा काय प्रकार आहे?

ज्या गणेश भक्तांवर हे गुन्हे दाखल झाले आहे त्यातील बहुतांश महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे, हा गुन्हा त्यांच्या पुढील आयुष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात म्हणून हे सर्व गुन्हे मागे घ्यायला हवे अशी मागणी गिर्हे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here