डबा घोटाळ्यावर चर्चा टाळण्यासाठी महापौरांनी सभागृहातून काढला पळ – नगरसेवक पप्पू देशमुख यांचा आरोप

0
50
Advertisements

चंद्रपूर – आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये माननीय महापौर यांनी सभा संपल्याचे जाहीर केले नाही,साधे आभार मानण्याचा सुध्दा शिष्टाचार पूर्ण केला नाही.सभा अर्धवट मध्ये सोडून तातडीने उठून गेल्या आणि त्यांच्या पाठोपाठ आयुक्त राजेश मोहिते हे सुद्धा निघून गेले.चंद्रपूर मध्ये झालेल्या डब्बा घोटाळ्याची चर्चा टाळण्याच्या हेतुने महापौरांनी सभागृहातून पळ काढला असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
मनपाने 31 दिवस डबे वाटप केले. एकूण वाटप केलेल्या डब्यांची संख्या 5 लाख 68 हजार आहे.याचा अर्थ दररोज अठरा हजार च्या वर डब्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक नगरसेवकांना काही दिवस सकाळ-संध्याकाळ 50 नंतर, 70 व शेवटी 100 डबे सकाळ-संध्याकाळ देण्यात येत होते. याचा अर्थ 71 नगरसेवकांना अंदाजे तीन ते साडेतीन लाख डब्बे देण्यात आले. उर्वरित अडीच लाख डबे सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या नावाने वाटप केले.याचे पुरावे आम्ही आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे दिले. कंत्राटदाराने व्हिडिओमध्ये नगरसेवकांच्या खाजगी गाडीमध्ये मनपा प्रशासनाच्या परवानगीशिवाय हे डबे देत असल्याचे स्पष्टपणे कबूल केलेले आहे. अडीच लाख डबे म्हणजे अंदाजे रुपये 75 लाखाच्या जवळपास मनपाच्या निधीचा पक्षासाठी गैरवापर केला.
डम्पिंग ग्राउंड वरील बायो मायनिंग च्या कामा मध्ये सुद्धा नियम डावलण्यात आलेले आहेत.नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कंत्राटदारांना पेटी कॉन्ट्रॅक्ट देण्याची परवानगी नसते.तशी तरतूद नियमात नाही.तरीसुद्धा बायो मायनिंगचे काम करणारे कंत्राटदार विश्वेष हायड्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ईकोस्पेअर मार्केटिंग सोल्युशन्स या कंपनीला पेटी कॉन्टॅक्ट दिले. याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या कराराची प्रत आमच्याकडे उपलब्ध आहे.आजच्या आम सभेमध्ये ही प्रत आम्ही माननीय महापौर यांना देणार होतो.विश्वेष हायड्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी नियम डावलून काम केले असा आमचा आरोप आहे.
या सर्व आरोपांचा अनुषंगाने माननीय महापौर यांना आमचे पाच प्रश्न आहेत. त्याची उत्तरे त्यांनी जनतेला जावी असं जाहीर आवाहन आहे.
1. डबा घोटाळ्याबाबत माननीय महापौर आपली भूमिका कधी स्पष्ट करून या घोटाळ्याची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देणार आहेत किंवा नाही ?
2. बायो मायनिंग च्या कामा मध्ये पेटी कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा प्रकार कोणत्या नियमात बसणारा आहे ?
3. बायो मायनिंग चे काम करणाऱ्या कंत्राटदाराला लाॅकडाऊनमध्ये तातडीने बोलवण्याचे कारण काय ? 4.बायो मायनिंगचा कार्यादेश देऊन अनेक महिने झालेले असताना यापूर्वीचे आयुक्त संजय काकडे यांनी या कंपनीचे काम रोखून ठेवले होते ते खरे आहे का ? व हे खरे असल्यास त्याचे कारण काय ?
5.क्वारंटाईन सेंटरवर जेवण पुरविण्याचे स्थानिक कंत्राटदारांचे काम अचानक बंद करण्यात आले, ही बाब खरी आहे का ? व हे खरे असल्यास यानंतर हेच जेवण पुरविण्याचे काम बदलून चंद्रपूर महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नागपूर येथील निकटवर्तीय कंत्राटदाराला काम देण्यात आले ही बाब खरी आहे का ?
चंद्रपुरातील सर्व सन्माननीय प्रसाद माध्यमांच्या द्वारे आम्ही माननीय महापौर यांना जनहितासाठी वरील प्रश्न विचारले आहेत.
त्यांनी वरील सर्व प्रश्नांचे उत्तरे जनतेला द्यावे हे आमचे त्यांना विनम्र आवाहन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here