लॉकडाउनच्या वाढीव बिलावर लावले बेशर्माचे फुल, कामे ठप्प तरीही वाढीव बिल दिल्याबद्दल महावितरणचे आभार

0
117
Advertisements

दुर्गापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याचा 24 तारखेला अचानक देशात ताळेबंदी जाहिर करण्यात आली. ताळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवसाय उद्योग ठप्प पडले. तिन महिन्याचा अवधीनंतर नारीकांना अचानक तिन महिन्याचे विजबिल पाठविण्यात आले परंतू ताळेबंदीमूळे आधिच घराचं बजेट पुर्णपणे उद्धवस्त झालेल्या नागरिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने संविधान संवर्धन समिती तर्फे फिरोजखान पणन यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीचे निषेधात्मक आभार आंदोलन करून विजबिल माफी संदर्भात अर्थमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

     ताळेबंदीच्या काळात शेतकरी कामगार, मजूर छोटेमोठे व्यवसाय पूर्णपणे बंद होते. ताळेबंदी काळात व्यवहार ठप्प झाल्याने सगळयांची आर्थिक कोंडी झाली. सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत असतांना सरकारने स्वतः राशन किट आणि कम्युनिटी किचनव्दारे जेवणाचे डब्बे पूरवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हळूहळू ताळेबंदी शिथील केल्यावरही अजूनही उद्योग व्यवसाय पूर्वपदावर यायचे असल्याने कामगार मजूर, छोटेमोठे व्यवसाय करणार्‍यांना घरासाठी जिवनावश्यक वस्तूंची तजविज करतांना तारेवरची कसरत करावी लागत  असतांना अचानक तिन महिन्याचे विज बिल आल्याने सामान्य नागरिक दोहर्‍या आर्थिक संभ्रमात पडले आहे.

Advertisements

     संविधान संवर्धनच्या माध्यमातून आंदोलनानंतर विजबील माफ करण्यात यावे याकरिता निषेधात्मक आभार म्हणून गुलाबाचे फुल देवून कनिष्ठ अभियंता, विज वितरण केंद्र दुर्गापूर (ग्रामीण) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. आंदोलन यशस्वी करण्याकरिता कपिल भगत, मेहबूबभाई शेख, जावेद पठाण, मारोती कांबळे, बबलू चनोडे, अमित मुरमाळे, शिलाबाई मूंजेवार, शरमीण पठाण, मायाबाई रामटेके, भाग्यलक्ष्मी मुसमलवार, सुरेखाताई वाकळे, किक्षरण नालमवार, सागर फ्ररकुंडे,  यांनी योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here