“सबका साथ, सबका विकास” तर दूरच हा सर्वांना “भकास” करणारा प्रधानमंत्री, गडचांदूरात आमदार सुभाष धोटे यांची टीका, पेट्रोल दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन

0
57
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“सबका साथ,सबका विकास” म्हणणारे प्रधानमंत्री यांचा विकास तर सोडाच हा सर्वांना “भकास” करणारा प्रधानमंत्री ठरल्याची टीका राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केली.ते अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार दररोज होत असलेली पेट्रोल,डिझेल दरवाढ थांबविण्यासाठी कोरपना तालुका व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचांदूर येथे आयोजित आंदोलना दरम्यान बोलत होते.देशात व राज्यात कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर संपुर्ण देशात ताळेबंदी असतांना गेल्या 4 महिन्यांपासून अनेकांच्या हाताला रोजगार नाही.रोजगारा अभावी शेतकरी,कष्टकरी,मजूर वर्ग व किरकोळ व्यवसायिकांचे अक्षरशः बेहाल झाले असून त्यांच्यापुढे जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून देशातील गोर-गरीब जनतेवर घोर अन्याय केल्याचे आरोप यावेळी करण्यात आले.कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक इंधन दरवाढ लादणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी जन आंदोलन उभारण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमीटीने घेतलेल्याची माहिती असून याच श्रेणीत केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी कोरपना तालुका व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीचे नेते,कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्यने उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here