आता तरी सिमेंट कंपन्यात रोजगार देणार का…? कोरोना मुळे गडचांदूरात हजारो तरुण बेरोजगार

0
56
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा

सिमेंट सिटी म्हणुन राज्यभर प्रचलीत असलेल्या गडचांदुर मधिल तरुन शिक्षीत स्थानिक बेरोजगारांचि सिमेंट प्रकल्पाकडुन निव्वळ थट्टाच सुरु आहे.म्हनतात कि ज्या तालुक्यात सिमेंट प्रकल्प अस्तित्वात आहे.त्या तालुक्यात रोजगाराला काही कमतरता नसतात.परंतु हि बाब गडचांदुर शहराला अपवाद ठरली आहे.या शहरात परप्रंतिय जास्त आले असुन स्थानिकांचा रोजगार यातुन तुटला आहे.
शासनाच्या नियमाला या प्रकल्पानी पुर्नता तिलांजली दिली आहे. गडचांदुरात तर सिमेंट प्रकल्प अगदी शहरात आला असुन या मुळे भविष्यात गडचांदुरातील नागरिकाना याचा मनस्ताप नक्की होनार आहे.शासकिय नियमानुसार ८० टक्के तर २० टक्के बाहेरिल नागरिकाना असा नियम सागंतो.मागे जिल्हा अधिकारी यानी या नियमाचे पालन करन्यास आदेश दिले होते असे सूत्रा कडून कळते आहे.परंतु कोणत्याहि शिक्षीत तरूनाना काम दिलेले दिसत नाही. तर शहरात काही तरुन बाहेरिल जिल्ह्यातील नौकरीसाठी आलेले दिसते सध्या कोरोनामुळे गडचांदूर मधील तरुण मंडळी बेरोजगार झाली आहे. त्यामुळे आता तरी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतील की नाहीत हा प्रश्न येथील बेरोजगार युवकांना भेडसावत आहे.

मागे नाविन प्रकलपात जागा आहे या उद्देशाने अनेक तरुनानि आपआपल्या पद्धतिने अर्ज केले खरे परंतु त्याना काही एक अपेक्षीत उ्तर आले नाही. काहींनी आपआपल्या जवळचे आणि राजकारनात आपल्याला मदत करणाऱ्यांना कामाला लावले आहे.जिल्हा अधिकारी साहेब आता तरी लक्ष द्या हो अशी हाक बेरोजगार करत कोरोनाच्या महामारीत करत आहे.

याबाबत स्थानिक नेते मंडळीनी या बाबीकडे लक्ष देऊन येथील सिमेंट प्रकल्पात स्थानिक होतकरू अभियंता तसेच फिटर आयटीआय तरुणांना त्वरित संधी देऊन न्याय देण्याची मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here