बिनबा गेटजवळील हिंदु स्मशानभुमीवर झालेले अतिक्रमण तातडीने हटवून जागा आरक्षीत करा:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

0
74
Advertisements

चंद्रपूर:- बिनबा गेटजवळील हिंदु स्मशानभुमी येथे मृतक लहान मुलांचे अनेक वर्षापासून दफन करण्यात येत आहे परंतू या हिंदु स्मशानभुमीवर अनेक लोकांनी अतीक्रमण करून घराचे व दुकानाचे पक्के बांधकाम करून ताराचे कुंपण केल्यामुळे या हिंदु स्मशानभुमी येथे लहान मुलांना दफन करण्याकरीता जागा शिल्लक राहीली नसुन सदर जागेवरील अतीक्रमण हटवून ती जागा मृतक लहान मुलांना दफन विधीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी बिनबा गेट परिसरातील नागरीकांनी निवेेदनाव्दारे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना केली.
या निवेदनाची तत्काळ दखल घेत महानगर पालीका आयुक्त यांचेशी दुरध्वनीवरून चर्चा करून सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना अहीर यांनी दिल्या. परंपरेने हिंदु लोकात लहान मुलांना दफन करण्यात येते परंतू या जागेवर झालेल्या अतीक्रमणामुळे मुलांचे दफन करण्याचा प्रश्न उभा ठाकला असुन हिंदु दफन स्मशानभुमी येथील अतीक्रमण तातडीने हटविण्याची कार्यवाही करण्याची अथवा अन्य जागा आरक्षित करून देण्याची मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मनपा आयुक्तांकडे पत्राव्दारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here