शहीदोंको सलाम…! गडचांदूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे “गलवान” घाटीतील शहीदांना श्रद्धांजली, चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची एकमुखी मागणी

0
191
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गलवान घाटीत चिनी सैनिकांच्या भ्याड हल्ल्यात चकमकीत शहीद झालेल्या भारतीय विर जवानांना कोरपना तालुका व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.गडचांदूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ “शहीदोंको सलाम” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात चीनचा निषेध करत चीनी वस्तुंवर पुर्णपणे बहिष्कार घालण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.शहीदांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून एक मिनिटाचा मौन पाळण्यात आला.यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रा.विट्ठलराव थीपे,नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,गटनेता तथा सभापती विक्रम येरणे,बिबीचे उपसरपंच प्रा.आशिष देरकर,राकाँचे रफीक निजामी,सभापती सौ.जयश्री ताकसांडे,शहर काँग्रेस अध्यक्षा रोहीत शिंगाडे,नगरसेवक राहूल उमरे,पापय्या पोन्नमवार,अहेमद भाई,शैलेश लोखंडे,सतीश बेतावार,देवीदास मून, आशिष लांढरे,राहूल ताकसांडे इतरांची प्रामुख्याने उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here