पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित, चौकशी करून कारवाई करा, अन्यथा आंदोलन, भाजप तालुकाध्यक्ष हिवरकर यांचा निवेदनातून इशारा

0
99
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील पिंपळगावसह इतर गावातील रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य न मिळाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी तहसीलदार कोरपना यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.कोरपना तालुका हे आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखले जाते.यातील पिंपळगाव येथील अनेक रेशनकार्ड नसलेल्या स्थानिक नागरिकांनी शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतला आधार कार्ड व इतर कागदपत्रे दिली .परंतु बोटांवर मोजण्या इतपत लोकांची नावे आली.यात स्थानिक व खरे लाभार्थ्यांची नावे आलीच नाही.आधीच कोरोनामुळे लाकडाउन जाहीर केल्यामुळे अनेक जणांना धान्यापासून वंचित राहावे लागले.ग्रामपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळे आजही अनेक खरे लाभार्थी धान्यापासून वंचित आहे.मोठ्याप्रमाणात पक्षपात झाल्याचे आरोप करत याप्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,येत्या सात दिवसात रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य न मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा हिवरकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. बाबाजी हरिभाऊ बोबडे,विकास दुर्वे,विजय वाडगूरे,नरेश गुरनुले,विनोद मेश्राम आदी ग्रामवासी तसेच भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते यांची उपस्थीती होती.याविषयी सखोल चौकशी करून न्याय देण्याची हमी तहसीलदार यानी उपस्थीतांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here