गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना”च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदी(लॉकडाऊनमुळे) अगोदरच सर्वसामान्य नागरिक,मजूर, किरकोळ व्यापाऱ्यांचे आर्थिक बजट अक्षरशः कोलमडले असून कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.आता यावर वीज वितरण विभागाने पाठवलेले वारेमाप बिल भरणे अनेकांच्या आवाक्याबाहेर असून लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा अशी मागणी वजा विनंती गडचांदूर शिवसेनेतर्फे महावितरणच्या उपकार्यकारी अभियंतांना दिलेल्या निवेदनातून मुख्य कार्यकारी अभियंताकडे केली आहे.विनंतीला मान न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी गडचांदूर नगरपरिषद गटनेता तथा नगरसेवक सागर ठाकूरवार,नगरसेवक शेख सरवर शेख शालू,नगरसेवक धनंजय छाजेड,नगरसेविका सौ.सुनीता कोडापे, नगरसेविका सौ.किरण अहिरकर,सौ. वैशाली गोरे,प्रणीत अहिरकर,दर्शन कोडापे इतर शिवसैनिकांची उपस्थीती होती.
शिवसैनिक आक्रमक….! वारेमाप आलेले वीज बिल माफ करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन, गडचांदूर शिवसेनेचा इशारा, निवेदन सादर
Advertisements