लॉकडाउन काळातील 3 महिन्याचे वीजबिल माफ करा – कंत्राटी कर्मचारी सेनेचे निवेदन

0
144
Advertisements

घुग्घुस – देश व राज्य कोरोना विषाणूच्या महामारीमूळे ताळेबंदी व संचारबंदीत अडकलेला होता.त्यामुळे छोटे मोठे उधोग,व्यापार,व रोजगार पूर्णता बंद पडले असल्यामुळे नागरिकांची कमाई पूर्णता बंद झालेली आहे.यामुळे गरीब, शेतकरी व मजूर कामगारावर उपासमारीची पाळी आली आहे अश्या अवस्थेत महावितरण कंपनीने नागरिकांना दहा हजार रुपयां पर्यंत वीज बील पाठवले आहे.यामुळे नागरिक दहशतीत आलेले आहेत.या समस्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सहाय्य्क अभियंता अमोल दुमने यांना निवेदन देऊन वीज बिलाची होळी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेनेचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे, तालुका प्रमुख सुमेश रंगारी, शहर प्रमुख परिवर्तन कुम्मरवार,सहसचिव विठ्ठल अतकरे, हिरालाल शहा, शिवसेना महिला आघाडी संगीता बोबडे, नीता मालेकर, नीता श्रीवास्त,उज्वला मडावी, आशा काळे, शिला धोबे, प्रिया बंडेवार, रंजना कामतवार व लडके ताई उपस्थित होते यावेळी सौ.संगीता बोबडे यांनी तीन महिन्याचे वीज बीज माफ करण्यात यावे अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here