ट्रक सोबत ३५ लाखाचा दारूचा साठा जप्त, एस.डी.पी.ओ यांच्या मार्गदर्शनात कोरपना पोलिसांची धडक कारवाई

0
173
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा
उपविभाग गडचांदूर अंतर्गत पोलीस स्टेशन कोरपना हद्दीतील मौजा नांरडा फाटा कडे जाणाऱ्या रोडवर काल दि.२५ गुरुवार ला दुपारच्या सुमारास नांरडा फाटा येथून एका ट्रक मध्ये दारूच्या साठा भरून जात असल्याची गुप्त माहिती गडचांदूर उपविभागीय अधिकारी यांना मिळताच पोलिसांनी सूत्र हलवून ट्रकचा मोठ्या शिताफीने पाठलाग करून वाहन क्रमांक MH 29, BE 2289 या ट्रकची झडती घेतली असता एकूण 100 देशी दारूच्या पेटी 5 लाखाचा साठा आढळून आला वाहन क्रमांक MH 29,BE 2289 वाहनाची किंमत 30 लाख असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून सदर कारवाईत आरोपी प्रकाश शालीकराव उईके उर्फ लोखंडे यांना अटक करण्यात आली असून त्यानुसार कोरपना पोलीस स्टेशनला अपराध क्र.153/ 2020 कलम 65 महाराष्ट्र दारू बंदी कायदा अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर गडचांदूर यांचेसह पोलीस निरीक्षक ए.एम गुरनुले,वसंत सिडाम,प्रकाश निमकर,राम हाके,स्वप्नील बोंडे,इत्यादी पोलीस कर्मचारी यांनी यशस्वी केली पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कोरपनाचे निरीक्षक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here