एक अविस्मरणीय क्षण….! वृद्धाश्रमात कुटुंबासह “आबीद अली” यांनी केला वाढदिवस साजरा, थरथरत्या हातांचा आशिर्वाद मन भारवणारा, धान्य कीट वाटप

0
117
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण मनाला जातो. यादिवशी कुटुंबासोबत केक कापून आनंदोत्सव साजरा केला जातो.मित्र मंडळी,नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो.एकुणच हा दिवस एक सणा सारखा साजरा करण्यात येतो.मात्र कोरपना येथील रहिवासी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी कुटुंबासह आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.25 जून रोजी सैय्यद आबीद अली यांचा वाढदिवस होता.या दिवसाचे औचित्य साधून अली यांनी आपल्या कुटुंबासह बल्लारशाह जवळील भिवकुंड आश्रमात जावुन तेथील सर्व जेष्ठ वृद्धांच्या उपस्थीतीत केक कापून वाढदिवस साजरा केला.योगायोगने अली यांची सुन फरहीन याचाही वाढदिवस होता.आश्रमातील जेष्ठ वृद्धांकडून मिळालेल्या आशिर्वाने मन भारावून गेल्याचे म्हणत कुटुंबासोबत याठिकाणी साजरा झालेला हा वाढदिवस माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरल्याची भावना आबीद अली यांनी News34 पूढे व्यक्त केली आहे.यावेळी पत्नी शमशाद बेगम,नगरसेवक मुलगा सुहेल अली,जुनेद अली,सुन यांनी उपस्थीत जेष्ठांना केकसह,जीवनावश्यक वस्तू धान्यकीटचे वाटप केले.वृद्धाश्रमात साजरा झालेला आबीद आली यांचा वाढदिवस सर्वत्र कौतुकपात्र ठरला आहे हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here