29 जूनपासून अटी शर्तीसह सलूनची दुकाने सुरू होणार – पालकमंत्री वडेट्टीवार यांची माहिती

0
115
Advertisements

पोर्टलचा विरोध करणाऱ्यांचा बहिष्कार

चंद्रपूर : लॉकडाऊन मुळं गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सोमवारपासून ही सलून दुकानं अटी शर्थीसह सुरू होणार आहे. लॉक डाऊन शिथिल केल्यावरही सलून दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळं या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलीय. राज्यात आर्थिक अडचणीमुळं 12 सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळं ही दुकानं सुरू करावी, हा विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुर्नवसन मंत्री यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here