मुख्यमंत्र्यांची हाक, शिवसेनेची साथ, जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन, रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
133
Advertisements

पोर्टलला विरोध करणाऱ्यांचा बहिष्कार

चंद्रपूर – कोरोना महामारी दरम्यान रक्ताची कमतरता भासू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा शिवसेना, युवासेनेच्या वतीने 25 जूनला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रामनगर सिंधी पंचायत भवनला आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत, कार्यक्रमात उपस्थित आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिरात शिवसेना, युवासेना कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले, शिवसेनेतर्फे आजपर्यंत जिल्ह्यातून 400 बॉटलच्या वरती रक्तदान केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, शहरप्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा समनव्यक निलेश बेलखेडे, शहरप्रमुख अक्षय अंबिरवार, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष नरुले, महिला आघाडीच्या मनस्वी गिर्हे, विद्या ठाकरे, संगीता लांजेवार, सौ. बुरडकर , सौ. रासपायले, सायली गिऱ्हे, प्रतीक्षा खांडरे,अल्का बोरगमवार आदींनी परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here