जंगलाचा विनाश थांबवा, बंदर कोल ब्लॉक रद्द करा – पर्यावरणप्रेमी चोपणे यांची मागणी

0
215
Advertisements

चंद्रपुर – सध्या चिमूर तालुका,चंद्रपुर जिल्ह्यात येऊ घातलेली बांदर कोळसा खाणीचा मुद्दा वृत्तपत्र आणि पर्यावरण, वन्यजीव कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे गाजतो आहे. 2010 सालीसुद्धा ह्या खाणीचा प्रस्ताव होता परंतु वन, वन्यजीवांना नुकसान होते ह्या कारणास्तव तिला मंजुरी देण्यात आली नाही. आता पुन्हा खाण आणि खनिज मंत्रालयाने हा खाणपट्टा निविदा काढून तो उत्खननासाठी खुला केला आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील वनक्षेत्रात आणि ताडोबा-बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉर मध्ये येत असल्याने तो वाघांसाठी आणि वन्यजीवांसाठी अत्यंत धोकादायक आहे. हा कोल ब्लॉक ह्यापूर्वी AMR Iron and steel pvt.ltd, Century textile and industry ltd,JK Cement ह्या कंपन्यांना दिला होता आणि आमच्या संस्थेने विरोध केला होता. हा कोल ब्लॉक 12.62 स्क्वे. कि.मी. चा असून त्यात 126.105 मेट्रिक टॅन C आणि D प्रतीचा कोळसा आहे. अजून लिलाव प्रक्रिया सुरू असल्याने नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, जेव्हा कुणाला हा ब्लॉक जाईल तेव्हा पूर्ण माहीती मिळेल. जर हा कोलब्लॉक दिला तर येथील बहुमोल जंगलाचा विनाश होईल, जैवविविधता नष्ट होईल, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होईल, वाघांचे आंतरप्रजनन होऊन संख्या कमी होईल, प्रदूषण वाढेल, भूजल पातळी कमी होईल, जलप्रदूषण होईल. परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या नावाखाली प्रदूषण आणि रोगराइचा सामना करावा लागेल.
आज देशाला कोळसा आधारित थर्मल पॉवर स्टेशन आणि उद्योगाची गरज नसून सौर ऊर्जेची गरज आहे, असे असताना जीवनाला अत्यावश्यक असणाऱ्या वनांना नष्ट करून प्रदूषणकारी खाणींना आपण परवानगी देणे योग्य नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा जगभर गाजलेला प्रकल्प आहे. पर्यटनांमुळे शासनाला खूप महसूल मिळतो. या महसुलाची किंमत, पर्यावरनाची किंमत कोळसा खाणी पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. प्रदूषण, हवामान बदल, कोविड सारख्या रोगाची लागण हे सर्व वनांशी निगडीत असताना त्याच चुका आपन वारंवार करीत आहोत.. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने ह्या खाणीच्या लिलाव प्रक्रियेला थांबवावे आणि पुढे कधीच ही आणि अश्या जंगलातील खाणींचा लिलाव करु नये अशी मागणी ग्रीन प्लानेट सोसायटी च्या वतीने करण्यात येत आहे. संबंधित मंत्रालयाने यापुढे जंगलातील कोल ब्लॉक लिलावासाठी काढू नये. या खाणी कायमस्वरूपी निकालात काढाव्या अशीही मागणी आम्ही केली आहे. वन, वन्यजीव आणि वाघाच्या अधिवासाला धोका पोहोचविणाऱ्या ह्या खणीला आमचा विरोध असून पुढे जर ह्या खणीला मंजुरी दिली तर अदानी खाणीच्या विरोधात जसे आंदोलन झाले तसे आंदोलन पुन्हा करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here