वीज बिल माफीसाठी आप चा पुढाकार, आमदार जोरगेवार यांना दिले निवेदन

0
36
Advertisements

चंद्रपुर:- आम आदमी पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे संचारबदीच्या काळातील 200 युनिट शासनाने माफ करावे म्हणुन जनतेमध्ये जाऊन स्वाक्षरी अभियान सुरु केले. याच विषयाला घेऊन चंद्रपुरचे अामदार किशोर जोरगेवार यांना विविध मागण्याचे अाप तर्फे निवेदन देण्यात अाले. संचारबंदीच्या काळात अनेक कुंटूबावर अार्थिक संकट कोसळले अाहे. अाम अादमी पार्टी ने माहाराष्ट्र शासनाला एक महिण्या पुर्वी निवेदन देऊन प्रती महिणा 200 युनिट विजबिल माफ करण्याची विनती केली होती. अापने हा मूद्दा घेऊन जनते मध्ये जाऊन स्वाक्षरी अभियानाला सुरुवात केली अाहे. शहरातील मीत्रनगर, विठ्ठल मंदीर वार्ड, वडगाव, दादमहल वार्ड, बंगाली कॅम्प, बाबुपेठ सह ईतर वार्डात चांगला प्रतीसाद मीळत अाहे. तरी दि. 24 जुनला चंद्रपुरचे अामदार किशोर जोरगेवार यांना शासनाने सरसकट प्रती महीणा 200 युनिट विज बिल माफ करावे, 1 एप्रिल पासुन सुरु झालेले निविन विजदर रद्द करण्यात यावे, सद्या तरी कोणाचीही विज कापु नये, अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात अाले. निवेदन देताना अापचे चंद्रपुर जिला संघटनमत्री परमजित सिंग झगडे , सचिव संतोष दोरखंडे, आप सोशल मीडिया प्रमुख राजेश चेड़गुलवार, सुनिल भोयर, योगेश अापटे, सिंकदर सागोरे, दिलीप तेलंग, प्रशात येरणे, संदिप पिंपळकर अजय डुकरे, देवकीताई देशकर, पुजा चौधरी, ममता मासीरकर, गंगा चौधरी, सुनिल वाजपेय,अादींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here