गोपीचंद पडळकर या विकृत मनोवृत्ती असलेल्या व्यक्तीचा चंद्रपुरात शरद पवार विचार मंचने केला निषेध

0
115
Advertisements

चंद्रपूर: शरद पवार विचार मंच जिल्हा चंद्रपूर तर्फे आज आम.गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध गांधी चौक चंद्रपूर इथे नोंदविण्यात आला.
सदर माथेफिरू व्यक्तीने आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विरुद्ध अपशब्द तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला . पवार साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकला सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा पायंडा त्यांनी समाजात रुजवीला आहे. पडळकरांची बारामती विधानसभा निवडणूकित डिपॉझिट जप्त झाली होती . ते रेडिमेड आमदार झाले आहे हे त्यांनी विसरू नये.यावेळी घोषणा देत, निदर्शन करीत पडळकरांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी शशीकांत देशकर, प्रदेश उपाध्यक्ष शरद पवार मंच, निमेश मानकर जिल्हाध्यक्ष, बाबा सातपुते, संजय तुरीले यांच्या उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here