अब्बास अजानि
भद्रावती
भद्रावती – राज्य शासनाकडून धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाकरीता असलेली बंदी कायम ठेवून टाळेबंदी मध्ये वाढ करण्यात आल्यास मूर्तिकारांकडून तयार करण्यात आलेल्या मूर्ती विकल्या जाणार नाही.त्यामुळे मूर्तिकारांचे व सार्वजनिक मंडळांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहणार नाही,असा इशारा भद्रावती नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी यांनी मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांना एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 लागू करण्यात आलेला आहे.त्यानुसार धार्मिक,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, क्रिडाविषयक, प्रदर्शन,शिबिरे,मेळावे,धरणे,आंदोलने इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
भद्रावती क्षेत्रातील मूर्तिकारांनी आगामी धार्मिक उत्सवाकरीता पूर्व तयारी म्हणून गणेश,शारदा,दुर्गा इत्यादी देवदेवतांच्या मातीच्या मूर्ती शासनाकडील पुढील
आदेशापर्यंत तयार करु नये.तसेच सार्वजनिक मंडळांनी सुध्दा उत्सवाची पूर्व तयारी करु नये,असे आवाहनही मुख्याधिकारी यांनी केले आहे.