चंद्रपूर – लॉकडाऊन दरम्यान लॉन तसेच नॉन एसी सभागृहांमध्ये लग्न समारंभासाठी परवानगी द्यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली होती. त्या मागणीला यश प्राप्त झाले असुन लॉनमध्ये 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभासाठी परवानगी देण्यात आली आहे. आता नॉन एसी सभागृहांमध्ये 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभांसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 22 जून 2020 रोजी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थान, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव श्री. किशोर राजे निंबाळकर यांनी एक परिपत्रक जारी करून सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिका-यांना याबाबत निर्देशित केले आहे.
50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसींग पाळून खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह येथे लग्न समारंभ पार पाडण्यास तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर सदर शासन आदेशाद्वारे याबाबत परवानगी देण्यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधी केलेल्या पाठपुराव्याला व प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.