गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव कोरपना येथे ग्रामीण,आदिवासी भागात चांदा ते बांदा योजनेंतर्गत तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी आमदार अॅड.संजय धोटे यांचा प्रयत्नातून उच्च शिक्षित बेरोजगार,गोरगरीब,होतकरू विद्यार्थी निर्माण व्हावे,यांना स्पर्धा परिक्षा,उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे धडे गिरवता यावे, अभ्यासिकेच्या उपलब्ध पुस्तकी ज्ञानातुन स्पर्धेची संधी मिळावी,सामान्य गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून मागिल 18,19 यावर्षात निधि उपलब्ध करून जागेचा प्रश्न तातडीने सोडवून सर्व सोयीसुविधा प्राप्त भव्य अशी देखणी व विद्यार्थना उर्जा प्रेरणा मिळेल अशी वास्तु उभी झाली.पुस्तक संच,बैठक व्यवस्था,भव्य परिसर,शैक्षणिक वातावरण याठिकाणी असून बांधकाम विभागाने ठरावीक कालावधीत सदर इमारतीचे बांधकाम पारपाडले.मात्र विधानसभा निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितामुळे उद्घाटन रखडले.आधूनिक पद्धतीने निर्माणाधीन सदर इमारत असून त्याठिकाणी नासधूस होऊ नये यासाठी उद्घाटन करून विद्यार्थ्यांना अभ्यास व शैक्षणिक प्रगतीसाठी उपलब्ध करून द्यावे व इमारत नगरपंचायतला हस्तांतर करून 1जुलै पर्यंत कार्यक्रम आयोजित करावा जूनमध्ये होणाऱ्या नगरपंचायत सर्वसाधारण सभेत इमारतीचा ताबा व अभ्यासिका त्वरित सुरू करण्याचा निर्णय द्यावा अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे सैय्यद आबीद अलींसह गावकरी व विद्यार्थी युवकांनी केली असून विलंब झाल्यास इमारत नासधूस होण्यापासून वाचविण्यासाठी अभ्यासिकेचा वापर सुरू करू असा इशारा दिला आहे.
कोरपना येथील “मिशन सेवा अभ्यासिका” इमारतीचे लोकार्पण करून न.पं.ला हस्तांतरित करा
Advertisements