फार्ममधील 60 गावरान कोंबड्या मृत्युमुखी, विषारी पदार्थ टाकल्याचा संशय! बिबी येथील घटना

0
204
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम बिबी येथील राजूरगुडा रोड वरील हबीब शेख यांच्या “निहाल अँग्रो फार्म” मधील लहान मोठे 60 गावरान कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याची घटना 22 जून रोजी सायंकाळी अंदाजे 7 च्या सुमारास उजेडात आली.पुर्ण शेतात जागोजागी कोंबड्या विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या.अज्ञात इसमाने जाणून बुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज शेख यांनी वर्तविला असून या प्रकारामुळे सुमारे 25 ते 30 हजारांचे नुकसान झाले आहे.कोंबडीचे पोस्टमार्टेम केले असता गहू व तांदळामध्ये विष टाकून खाऊ घालण्यात आले असावे असा अंदाज बांधला जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून शेख यांनी मागील वर्षापासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता.मंदीच्या काळात अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे आर्थिक फटका बसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here