शरद पवार विचार मंच कार्यकरणीचा विस्तार सुरू, 1 प्रभाग 1 अध्यक्ष होणार नियुक्ती

0
193
Advertisements

चंद्रपूर : शरद पवार विचार मंचाची पहिली मीटिंग आज चंद्रपूर शहर मनपा प्रभाग क्रमांक 17 , दरीया नगर वॉर्ड ,इथे संपन्न झाली असून मीटिंगचे आयोजन शुभम प्रजापती यांनी केले होते. सदर मिटींग शरद पवार विचार मंचाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री शशिकांत देशकर यांच्या मार्गदर्शनात,तसेच शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष श्री निमेश मानकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली असून यावेळी या प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
उपस्थित नागरिकांना शशिकांत देशकर यांनी शरद पवार विचार मंच बद्दल माहीती दिली . जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी शरद पवार विचार मंचाचे कार्य समजून सांगितले तसेच समाजातील प्रमुख समस्या या मंचा च्या माध्यमातून सोडविण्यासाठी कटिबध्द आहो असे सांगितले. आयोजक शुभम प्रजापती यांची मनपा प्रभाग क्रमांक 17 प्रभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना शशिकांत देशकर, निमेश मानकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.त्यानंतर प्रभागातील नागरिकांनी समस्या सांगितल्या. त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी लवकरच मनपाला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here