गडचांदूरातील शिवाजी महाराज पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी टाळाटाळ, नगरसेवक डोहे यांचा आरोप

0
193
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात सौंदर्यीकरण करण्याची मागणी करत स्थानिक नगरपरिषद याविषयी निव्वळ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद डोहे यांनी केला आहे.मागील काळात याविषयी ठराव घेऊन तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी घेण्यात आली.निवीदा बोलवण्यात आले आणि दर निश्चित करून ठेकेदाराला काम सुद्धा देण्यात आले.परंतु कामाला सुरूवात होणार इतक्यातच नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक जाहीर होऊन आदर्श आचारसंहिता लागू झाली.त्यामुळे सदर काम रखडले होते आणि आता सत्तापालट झाल्यानंतर सदर कामाला सुरुवात करतेवेळी इस्टिमेट मध्ये बदल करण्याचे कारण पुढे करून गेल्या 16 मार्च 2020 च्या सर्वसाधारण सभेत फेर निविदा बोलावण्या बाबतचा ठराव पुन्हा पारीत करण्यात आला.पुन्हा नव्याने तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी घेऊन काम करण्यात येईल असे सांगण्यात आल्याची माहिती देत आजतागायत सदर काम सुरू करण्यात आले नसून यासाठी निव्वळ टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप डोहे यांनी केला आहे. देशावर आलेल्या “कोरोना” नामक संकटामुळे काम बंद होते मात्र आता शहरातील विकास कामांना सुरूवात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणाच्या कामाला विनाविलंब सुरूवात करावी अशी मागणी डोहे यांनी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून केली आहे.आता सदर कामाची सुरूवात केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here