आणि त्या वसुली गँग वर गुन्हा दाखल, बोगस अधिकारी बनून अवैध रेती तस्करांकडून केली होती वसुली

0
31
Advertisements

घुग्गुस – घुग्गुस येथील वढा भागात काही दिवसांपूर्वी एका महिलेने अवैधरित्या होत असलेल्या वाळू माफियांना खनिकर्म अधिकारी सांगत 30 हजारांचा चुना लावला होता, त्या महिलेवर व सोबत असलेल्या दोघांवर भादवी कलम 170, 419, 420, 34 या कलमांतर्गत घुग्गुस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात अवैध रेती तस्करांचा धुमाकूळ माजला आहे, परंतु या चोरांवर मोर आपल्या जिल्ह्यात आहे.
स्वतःला खनिकर्म अधिकारी असल्याची बतावणी करीत पोलीस पाटलांना सोबत घेत रेती तस्करांकडून वसुली केली.
पोलीस पाटलांनी त्या महिलेचं नाव प्रिया असल्याचे सांगितले, आम्ही खनिकर्म कार्यालयातून आले असल्याचे सांगत मला बोलावले होते.
प्रिया नामक त्या महिलेने अत्यंत शिताफीने कुणालाही संशय न येता त्या घाटावर दाखल झाली या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला.
त्या व्हिडीओच्या आधारे खनिकर्म विभागातील खेडेकर मॅडम यांनी याबाबत घुग्गुस पोलीस स्टेशनला माहिती देत गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार त्या प्रिया गँग ने जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वतःला अधिकारी सांगत वसुल्या केल्या आहे, आता घुग्गुस पोलीस या बोगस अधिकारी महिलेवर काय कारवाई करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here