जंगल, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी ईको प्रो संस्थेचे निदर्शने, बंदर खाण लिलाव रद्द करण्याची मागणी

0
30
Advertisements

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प च्या उत्तरेकडील व्याघ्र-वन्यप्राणी भ्रमणमार्ग मधे प्रस्तावित बंदर कोळसा खाण पट्टाच्या लीलावास विरोध करण्यात येत असल्याने याचाच एक भाग म्हणून काल (22 जून) इको-प्रो तर्फे संपूर्ण ताडोबा प्रकल्पास परिक्रमा करित मोटरसायकल रैली काढण्यात आली. या रैली दरम्यान इको-प्रो चे सदस्य व चिमूर तालुक्यातील पर्यावरण संस्थाचे प्रतिनिधि यांनी बंदर कोळसा खाण च्या वनक्षेत्रात जोरदार निर्दर्शने केली.

यापूर्वी सुद्धा सदर वनक्षेत्रात कोळसा खान करिता खाजगी कंपनीना खाण पट्टा देण्यात आलेला होता. मात्र वन-वन्यजीव संवर्धन करिता धोकादायक असल्याने सदर प्रकल्पास सर्व स्तरातून विरोध झालेला होता. बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया च्या लिलाव यादीतून वगळण्याच्या मागणीकरिता इको-प्रो तर्फे यापूर्वी मूक निदर्शन व आता इको-प्रो च्या 40 सदस्यांनी ताडोबा सभोवताल 230 किमी परिक्रमा मोटरसायकल ने पूर्ण करित कॉरिडोर ‘वाचवा, वाघ वाचवा, जंगल वाचवा’ चा संदेश दिला, सोबत या दरम्यान प्रस्तावित कोळसा खानीच्या वनक्षेत्रात जाऊन इको-प्रो सदस्यांनी बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात स्थानिक वन्यजीव प्रेमी सोबत जोरदार निदर्शने केली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रास लागून असलेल्या वनक्षेत्रतिल बंदर कोल ब्लॉक कोल इंडिया तर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या 41 कोल ब्लॉक अंतर्गत या कोल ब्लॉकचा समावेश आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघाची संख्या, आवश्यक व्याघ्र अधिवास ची कमतरता, दिवासागणिक वाढत असलेला जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष, व्याघ्र कॉरिडोर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग अधिक सुरक्षित करीत संवर्धन करण्याची गरज असताना अशातच सदर कॉल ब्लॉक चा लिलाव म्हणजे ताडोबा प्रकल्प व व्याघ्र संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे, यामुळे इको-प्रो पर्यावरणप्रेमी मधे तीव्र नाराजी आहे. ‘बंदर कोल ब्लॉक’ कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी इको-प्रो चे संस्थेची सदस्य तसेच चिमूर तालुक्यातील वन्यजीव प्रेमी तरुण पर्यावरण वादी मंडळ चे अमोद गौरकर, वीरेंद्र हिंगे, पर्यावरण संवर्धन समिती चे कवडू लोहकरे, , पंचायत समिती सदस्य अजहर शेख व इको-प्रो चे नितिन रामटेके, अब्दुल जावेद, धर्मेंद्र लुनावत, सुधीर देव, वैभव मडावी, सुमित कोहले आदि सदस्य सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here