अरे हे काय? इथे वाहनांचा झाला अंतिम संस्कार

0
180
Advertisements

विक्की गुप्ता/प्रतिनिधी

घुग्घुस :- देशात कोरोना विषाणूमूळे मागील तीन महीण्यापासून ताळेबंदी, संचारबंदी, जिल्हाबंदी लागू झालेली होती.
सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, रोजगार पूर्णता ठप्प झालेले होते. गोरगरीब, मध्यमवर्गीय सर्वांनाच जीवघेण्या आर्थिक समस्यांशी सामना करावा लागत आहे.
आता हळूहळू ताळेबंदी हटविण्यात येत आहे.
नागरिक रोजगाराच्या शोधात निघायला लागले आहेत.
आता मात्र उपासमारीच्या संकटाशी तोंड देत असलेल्या रोजगाराच्या शोधात निघालेल्या नागरिकांना नागरिकांना व्यापाऱ्यांना डिजल पेट्रोल यांच्या दरवाढीचा जीवघेणा सामना करावा लागत आहे.
मागील 16 दिवसापासून देशात दररोज पेट्रोल व डिजलचे दर वाढत आहे.
डिजल दरवाढीमुळे अन्नधान्या पासून अनाज किराणा मालाच्या दारात वाहतुकीचे भाडे वाढल्यामुळे मोठया प्रमाणात महागाई वाढली आहे.
गाडीत पेट्रोल टाकणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही एकीकडे क्रूड ऑईलच्या किमतीत घसरण होत असताना देशातील नागरिकांना सवलतीत पेट्रोल – डिजल देणे सोडून उलट दिवसागणिक दर वाढवत आहे.
आज दिनांक 23 जून रोजीचा घुग्घुस येथील पेट्रोलचा दर 86.58 पैसे तर डिजलचा दर 76.67 दर इतके आहे.
सततच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात स्प्लेडर दुचाकीचे विधिवत अंत्यसंस्कार विधी करून प्रतिकात्मक स्वरूपाचा अभिनव आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, अजय उपाध्ये, विशाल मादर, शहजाद शेख, अंकुश सपाटे, कल्याण सोदारी, संजय कोवे, रोशन दंतलवार, रंजित राखूनडे, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here