गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:- महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 च्या कलम 36 अ व ब नुसार शासनाच्या परवानगी शिवाय जमीन खरेदी विक्री व्यवहार प्रतिबंध असताना तत्कालीन महसुल अधिकारी व कंपनीने चुकीच्या पद्घतीने सिलिंग जमीन दाखवित बनावट खरेदी खत,नौकरीचे आमीष दाखवून बडकावली.त्या जागा अकृषक नकरता त्याठिकाणी कर्मचारी निवास,गाळे व विद्युत उपकेंद्र उभारून शासनाची दिशाभूल व महसूल बुडविला.शेत सर्व्हे नं.१८/१ जमीन ४ हेक्ट १७ आर जमीन परत व फेरफार नोंद रद्द करण्याची केस तहसिलदार राजूरा यांच्या नायायलयात दाखल केली असून 25 जून रोजी सुनावणी होणार आहे.नोकारी येथील 14 आदिवासींची फसवणुक करून नियमबाह्य बांधकाम केल्याचा आरोप अन्याग्रस्त शेतकर्यांनी केला आहे.अनेक कुटुंबांना नोकरीचे पत्र दिले.मात्र कार्यालयात कधीच बाजू ऐकून घेतली नाही.उडवाउडवी करीत दिशाभूल केल्याने आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल करून चौकशी व नोकरीच्या नावावर फसवणुक झाल्याने अनेक कुटुंब उघडयावर पडले यासाठी न्यायलयाचे दार ठोठवणार असे सोमा आत्राम या आदिवासी बांधवांनी सांगितले आहे.
ना नोकरी दिली,ना दिला मोबादला……! माणिकगड सिमेंट कंपनीकडून आदिवासींची घोर फसवणुक
Advertisements