गणेश लोंढे / नांदा फाटा
संपूर्ण देश कोरोना सारख्या संसर्ग जन्य रोगाचा सामना करत असताना राज्यासह जिल्यात संचार बंदी लागू करण्यात आली मात्र अंतरराजिय सीमा अद्यापही बंद आहे लगत असलेल्या यवतमाळ,जिल्यातील व तेलंगाणा राज्यातील दारू दुकाने उघडण्यात आले आहे नांदा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री सुरू असून लहान मुलेही यात गुंतले आहे मात्र ही दारू दुसऱ्या जिल्ह्यातून येतेच कशी हा प्रश्न जनता विचारत असून रात्रीस खेळ चालत असून तस्कर रात्रोस दारूचा पुरवठा होणारा साठा येथील चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करून दिवसभर नांदा फाटा परिसरातील नथु कॉलनी,रामनगर,नांदा गावात,पेट्रोल पंप आवरपूर,या ठिकाणी सर्रास विकल्या जात असून नथु कॉलनी मदयशौकीन ची हजेरी लागायची विक्रेते वाट पाहत असल्याची माहिती शौकिनांकडून मिळते मात्र जिल्याच्या सिमेवर चौक्या मोठ्या प्रमाणावर असताना दारूचा महापूर वाहत आहे तर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक मोठ्या कारवाही होत आहे लाकडाऊन संचार बंदीत पोलीस विभागाची भूमिका महत्वाची असून कर्तव्यदक्ष पोलीस आपली आपले कर्तव्याची भूमिका बजावत असतांना दिसते मात्र नांदा फाटा याला अपवाद ठरत असून केसेस दाखविण्याकरिता चिल्लर दारू विक्रेत्यांना पकडून केसेस दाखविल्या जात असून मोठ्या दारू तस्कराणा दुजोरा देऊन मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या दारू विक्री केली जात आहे ही दारू बंदीच्या जिल्ह्यात भ्रष्ट व चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांशी आर्थिक संबंधातून अवैद्य दारू विक्रीत्याकडे ट्रकने व महागड्या कार नी दारू पार्सल केली जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहे
चुकून एखाद्या विक्रीत्याकडून पोलिसांशी अर्थसंबंध चुकला तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारून त्यांना दारूचा साठा घेतला कुठून हा जाब न विचारता दारू विक्रीत्यावर कारवाई केली जाते तर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून अनेक दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात दारू विक्री करीत असल्याचा चर्चा आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असून पोलिसांनी अतिकार्यक्षमतेने कार्य करण्याची गरज आहे सामान्य जनता तोंडी तक्रारी करून थकलेले आहे जर हे असेच सुरू राहील तर एक दिवस असा येईल की बघावे त्या ठिकाणी मुजोरी व प्रत्येक ठिकाणी तळीराम दिसून येतील एवढेच.
नांदा फाटा परिसरात दारू विक्रीला उधाण, पोलिसांचे दुर्लक्ष दारू तस्करांचे अच्छे दिन
Advertisements