पत्नीच्या विरहेत पती झाला सती, पत्नीच्या पेटत्या चितेवर उडी मारून संपविल आयुष्य, भंगाराम तळोधीतील घटनेने सर्वत्र हळहळ

0
158
Advertisements

गोंडपिपरी : जुन्या काळात पतीच्या अंत्यसंस्कार मध्ये पत्नी पण चितेवर पतीसह सती होत होती, ती प्रथा संपुष्टात आली असली तरी आजच्या युगात सुद्धा अशी घटना म्हणजेच अंगाला शहारे आणणारीच आहे.

एकोणविस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह रविवारी आढळून आला. लाँकडाऊनच्या पाच दिवसापुर्वी तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती होती. आज(सोमवारी)तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतांना अचानक जळत्या चितेवर पती किशोर खाटीक यांनी उडी घेतली.यावेळी उपस्थित जमावानी किशोरला चितेबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाला न जुमानता त्याने चितेलगतच्या विहिरीत उडी घेतली. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.नवविवाहित गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने देखिल स्वतःला संपविल्याची खळबळजनक घटना भंगाराम तळोधीत घडली. ह्या घटनेने अवघे समाजमन हादरले आहे.

Advertisements

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रूचीता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती.चार दिवसापुर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे माहेरी आली.रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली. पण बराच वेळपर्यत घरी परतलीच नाही. यामूळे नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ तिचा लोटा व चप्पल आढळून आली. यामूळे शंकेची पाल चुकचुकली.पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याने शोधाशोध केली त्यावेळी विहिरीमध्ये रूचीताचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला. लाँकडाऊनच्या अगदी पुर्वीच तिचा विवाह झाला होता. ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असतांना आज(सोमवारी) तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होता.अचानक पेटत्या चितेवर पती किशोरने उडी घेतली.यावेळी जमावणी त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना न जुमानता स्वतःला संपविण्याच्या प्रयत्नात लगतच्या विहिरीत किशोरने उडी मारली.यावेळी उपस्थितांनी आरडाओरड केली.त्याला वाचविण्याचा प्रयत्नही झाला.मात्र सारे प्रयत्न निष्फळ ठरले.आणि पत्नी रुचितासोबत पती किशोरने जगाचा निरोप घेतला.मन हेलवणाऱ्या या घननेनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here