प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुग्गुस – लॉकडाउन मुळे जिल्ह्यातील सीमाबंदी असताना सुद्धा छुप्या मार्गाने अवैध दारूची वाहतूक होत आहे.
अश्याच 4 दारू तस्करांना घुग्गुस पोलिसांनी अटक केली आहे.
सदर अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती घुग्गुस पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून विभिन्न घटनेत 4 आरोपीना अटक केली.
पहिल्या घटनेत एसीसी सिमेंट कंपनीच्या मागील भागात सदर दारू तस्कर येत असल्याने घुग्गुस पोलिसांनी 2 आरोपीना अटक केली.
दोन्ही आरोपी हे चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील आहे, 43 वर्षीय शक्ती शैलेंद्र मंडल, तर 31 वर्षीय दिलीप संतोष बिस्वास यांनी दुचाकीवर एकूण 10 हजारांची विदेशी दारू व एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली, सदर कार्यवाहीत 60 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत धानोरा फाट्याजवळ चारचाकी वाहनात दारूची वाहतूक होत असतानाची माहिती पोलिसांना मिळाली असता सापळा रचत 2 आरोपीना अटक केली आहे.
या कार्यवाहीत एकूण 1 लाख 50 हजारांची दारू सहित चारचाकी वाहन जप्त केले, यामध्ये एकूण 6 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही कारवाईत 4 आरोपी सहित 7 लाख 26 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे. सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी घुग्गुस पोलीस निरीक्षक गांगुर्डे, सपोनि चहांदे, कर्मचारी आमटे, सचिन, महेश, सुधीर , शार्दूल व निलेश अथक परिश्रम केले.