कुलरचा करंट लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू, हरदोना(खुर्द)येथील घटना, सर्वत्र शोककळा, हळहळ व्यक्त

0
113
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
राजूरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अंबुजा सिमेंट कंपनी जवळील हरदोना(खुर्द) येथील एका महिलेला कुलरचा करंट लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सुमनबाई राजूरकर वयवर्ष अंदाजे 58 असे महिलेचे नाव असून सदर महिला 22 जून रोजी सकाळी अंदाजे 7 च्या सुमारास घरकाम करीत असताना कुलरचा स्पर्श झाल्याने करंट लागला.यामुळे सदर महिला जागेवरच बेशुद्ध पडली.लगेच ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here