ख्वॉजा मोईनोद्दीन चिश्तींचा अपमान असाह्य, टिव्ही एंकर “अमीष देवगन” च्या त्या वक्तव्याचा निषेध, कोरपना तहसीलदारामार्फत गृहमंत्र्यांना निवेदन, कारवाईची मागणी

0
197
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगात अनेकांचे श्रद्धास्थान असलेले अजमेरच्या धरतीवर विराजमान सुफी संत “हजरत ख्वॉजा मोईनोद्दीन चिश्ती रहेमतुल्ला अलैह” यांच्याबद्दल टिव्ही एंकर अमीष देवगन यांनी अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याने मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे.ख्वॉजा गरीब नवाज़ विषयी अशाप्रकारे उदगार काढून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.देशभरात या टिव्ही एंकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना याच श्रेणीत गडचांदूर येथील सामाजिक कार्यकर्ते नासीर खान अफज़ल खान यांनी मुस्लिम बांधवांनासह कोरपना तहसीलदारामार्फत राज्याचे गृहमंत्री ना. अनील देशमुख यांना निवेदनाद्वारे अमीष देवगनवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यावेळी शेख वहाब भाई,अहेमद शेख,कय्यूम खान,निसार शेख, मूसा भाई,रसूल शेख,ईसाक बेग, मोबीन बेग यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात आल्याचे यावेळी पहायला मिळाले हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here