कोरपना तालुका क्रिडा संकुल विकासाकडे संबंधितांचे दुर्लक्ष, आबीद अली यांचा आरोप

0
190
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
शिक्षणातून क्रिडा क्षेत्रात संधी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 2012 यावर्षी युवा कल्याण धोरण जाहीर करून तालुका स्तरावर धाव पट्टी,मैदान विकासित करण्यासाठी आर्थीक तरतूद केली.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे क्रिडासंकूल निर्माण करण्यात आले.मात्र बांधकाम केलेली सदर इमारत कोणाच्या ताब्यात आहे हे मात्र न उलगडणारे कोडे बनले आहे.सुरक्षेच्या दृष्टीने याचा वापर बिनधास्तपणे जुगार व दारूच्या मैफिली जमवण्यासाठी होत असल्याची चर्चा सुरू असून इमारतीचे दरवाजे नासधूस व चोरीला जात आहे.येथे विद्युत सेवा व व्यायम साहित्य उपलब्ध झाले नाही.ग्रामीण भागात व्यायम शाळा व क्रिडा साहित्य ग्रामपंचायत व जि.प.शाळेत मिळाल्याने युवा त्याचा लाभ घेत असतानाच तालुकास्तरीय क्रिडा संकुल उघडयावर व अर्धवट असल्याने युवक व जेष्ठ नागरिकांचा हिरमोड होताना दिसत आहे. पोभुर्णाच्या धर्तीवर दुर्गम आदिवासी विभागातील कोरपना तालुका क्रिडा संकुल विकसित करण्यासाठी आराखडा तयार करून आर्थिक तरतूद करण्याची मागणी जनसत्याग्रह संघटनेचे सैय्यद आबीद अली यांनी पालकमत्री विजय वडेट्टीवार,युवा कल्याण क्रिडा मंत्री,जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here