शहर शिवसेना कार्यालयात भीषण आग, लाखोंचे नुकसान

0
113
Advertisements

चंद्रपूर – 21 जूनच्या सायंकाळी शहरातील ढगाळ वातावरणामुळे काहीवेळांसाठी वाऱ्यासह पाऊस आल्याने अनेक नागरिकांच्या घरचा वीज पुरवठा बंद झाला होता, परंतु वारंवार वीज पुरवठा खंडित होत असताना शहरातील तुकुम भागात शहर शिवसेनेच्या कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.
सायंकाळी शिवसेना कार्यालयात कुणी नसल्याने काही मोठी दुर्घटना घडली नाही, या आगीत शिवसेना कार्यालयातील सर्व फर्निचर जळून खाक झाले, 4 ते 5 लाखांचे नुकसान झालं असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील यांनी news34 सोबत बोलताना दिली.

शिवसेना कार्यकर्त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केल्याने आगीवर नियंत्रण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here