अवैध रेती तस्करी प्रकरणातील जप्त वाहन कांग्रेसचे कात्याल यांच्या मालकीचे, महिन्याभरा आधीच ते वाहन किरायाने देण्यात आले, वाळू तस्करी प्रकरणात कात्याल यांचा संबंध नाही

0
115
Advertisements

चंद्रपूर – अजयपूर जवळील अंधारी नदी परिसरात रामनगर पोलिसांनी रेती तस्करांवर कारवाई केली होती, या प्रकरणात 2 जणांना अटक सुद्धा झाली, प्रकरणात जप्त करण्यात आलेले जेसीबी वाहन क्रमांक mh34 ap 3433 हे जप्त करण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे वाहन युवक कांग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कात्याल यांचे आहे असे निष्पन्न झाले, या रेती तस्करी प्रकरणात सचिन कात्याल हे मुख्य आरोपी आहे अशी चर्चा विरोधी पक्षांनी सुरू केली. कात्याल यांचेवर राजकीय स्वार्थापोटी वाळू तस्करीचे आरोप केले होते.
परंतु या प्रकरणात नवीन बाब उघडकीस आली आहे ती म्हणजे वाळू तस्करी प्रकरणात जे आरोपी पकडल्या गेले त्यांनी ते जेसीबी वाहन कात्याल यांचेकडून किरायाने घेतले होते.
या संबंधीचा करार 15 मे 2020 रोजी करण्यात आला होता व हा करार 15 नोव्हेंम्बरला संपुष्टात येणार होता.
त्या करारनाम्यात स्पष्ट उल्लेख आहे की जर कोणत्याही फौजदारी प्रकरणात वाहन जप्त, किंवा कारवाई झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी वाहन किरायाने घेतलेल्या इसमावर राहील.
करारनामा लिहून घेणार तुळशीराम देवतळे व लिहून देणारे कात्याल हे आहे.
या प्रकरणात कात्याल यांचं नाव म्हणजे त्यांचे राजकारणात असलेले छुपे वैरी, ज्यांनी राजकीय स्वार्थापोटी कात्याल यांचे नाव समोर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here