घुग्गुस – जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची गॅंग सक्रिय झाली आहे पण या गँग कडून पैसे वसुली करणारी नवीन गॅंग तयार झाली आहे.
घुग्गुस भागातील वडा या ठिकाणी वाळू माफियांनी रेती काढत जवळच्या शेतात साठवणूक करून ठेवली आहे सदरची माहिती प्रिया गँग व 3 सहकारी यांनी मिळून वढा परिसर गाठत ट्रॅक्टरची वाहतूक थांबवून आम्ही खनिकर्म अधिकारी आहोत कागदपत्रे दाखवा अशी बतावणी त्यांना केली.
गावातील पोलीस पाटील वरारकर यांना तात्काळ फोन करून बोलाविण्यात आले.
वाळू माफियांकडून त्या प्रिया गँग ने 30 ते 40 वसुली केली असल्याचे समजते.
सध्या जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने वाळू माफिया सक्रिय झाले आहे.
रेतीचा दिवसरात्र उपसा करून हे माफिया खनिज व महसुलाच मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.
याबाबत खनिकर्म विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ या प्रकरणी चौकशी करून त्या गँग वर कारवाई करू असे संकेत दिले आहे.
चंद्रपुरात वाळू माफियांवर प्रिया गँग भारी, खनिकर्म अधिकारी असल्याची बतावणी करीत केली वसुली
Advertisements