पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही सोयाबीन शेतकरी संकटात : नुकसानभरपाईची मागणी

0
26
Advertisements

पोर्टलला विरोध करणाऱ्यांचा बहिष्कार

अब्बास आजानी/भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील शेतकऱ्यांनी या हंगामात शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली, सोयाबीन पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस व वातावरण असतांनाही जमिनीत टाकलेले बियाणे उगवलेच नसल्याने भद्रावती तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील पिरली, मांगली, वाघेडा, सागरा, धानोली, मासळ, आष्टी, सोनेगाव व ईतरही गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली होती. सोयाबीन बीज उगविण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस, तापमान आदि पोषक आणि अनुकूल वातावरण असतांनासुध्दा जमिनीतील बीज उगवले नाहीत. यामुळे भद्रावती तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आधिच कर्जाचा डोंगर अंगावर असतांना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांनी तीन वेगवेगळ्या सोयाबीन उत्पादक कंपन्यांकडून बियाणे खरेदी केलेले आहेत. तसेच शेतात लागवड करतांना बियाण्यांसोबतच खते, मजुरांची मजुरी व ईतर खर्च लक्षात घेता, शेतकऱ्यांना प्रत्येकी कमीतकमी ५० हजार रूपयांच्या जवळपास खर्च आला आहे. मात्र हे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकर्‍यांचा सर्व खर्च वाया गेला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाला याविषयी लेखी तक्रारी दिल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या लेखी तक्रारींच्या आधारावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी भाजप महामंत्री नरेन्द्र जीवतोडे, पंचायत समिति सभापती प्रवीण ठेंगणे, कृषि अधिकारी सुशांत गाडेकर, वनसिंघ, डोर्लीकर, कृषि अधिकारी मोहिनी जाधव तसेच सोयाबीन बियाणे कंपनीचे सेल्स मॅनेजर उपस्थित होते.

-अब्बास आजानी… भद्रावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here