भाजपच्या “हर घर जनसंपर्क अभियानाला” उत्स्फुर्त प्रतिसाद, कोरपना येथे मोदी सरकाचे निर्णय व योजनांच्या माहितीचे पत्रक वाटप

0
107
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना भारतीय जनता पार्टी शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “हर घर जनसंपर्क अभियानाला” उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून सदर अभियान येथील बूथ क्रमांक 67 वार्ड क्रं.2 मध्ये राबविण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण, शेतकरी सिंचन,उद्योग विकास,आरोग्य,प्रधानमंत्री गरीब कल्याण कामगार यांच्या हितांसाठी घेतलेले धडाडीचे निर्णय व संदेश विविध योजना प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्ह्याचे माजी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहीर,माजी आमदार अॅड.संजय धोटे,जिल्हा संयोजक देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात सदर अभियान राबविण्यात आले.पंतप्रधान मोदी सरकारच्या विविध निर्णय व योजनांची माहितीचे पत्रक जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बुथ क्रं.67क्षेत्रातील प्रत्येक घरी संवाद व माहितीचे पत्रक वितरण करून कुंटुब योजनांविषयी अडचणी व विकासाबाबत चर्चा केली. यावेळी वार्डचे नगरसेवक सैय्यद सुहेल आबीद अली,रमेश मालेकर,किशोर बावणे, महेंद्र बोरा,सुनिल देरकर सहभागी झले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here