चंद्रपुरात वाळू माफियांच्या वाहनचालकावर रामनगर पोलिसांची कारवाई, आरोपींच्या मागे मोठे राजकीय पाठबळ?, प्रशासन संपूर्ण वाळूचा महसूल वसूल करणार का?

0
35
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याचा काळाबाजार सुरू आहे, जिल्ह्यातील खनिज संपत्तीवर सध्या माफियांची नजर आहे, दिवसरात्र एक करून हे माफिया खनिज संपत्ती चोरी करीत आहे.

काही दिवस आधी गृहमंत्री देशमुख यांनी अवैध रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले होते, त्यांच्या निर्देशानंतर प्रशासन सतर्क झाले असले तरीसुद्धा वाळू माफिया मात्र मुजोरीने रेती घाटावरून वाळूची तस्करी करीत आहे.

20 जूनला रामनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मौजा जयपूर जवळील अंधारी नदी शेजारील शेतात एक इसम जेसीबी मशीनच्याया साहाय्याने हायवाद्वारे रेती तस्करी करीत आहे.

रामनगर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना व तलाठी यांना सोबत घेत पाहणी केली असता जेसीबी व हायवा चालक रेतीची उचल करताना आढळले व तात्काळ पोलिसांनी त्यांना अटक केली.

जेसीबी चालक आरोपी नामे तुळशिराम भाउजी देवरे आणि हायवा ट्रक चालक आरोपी नामे आदिल खान अहमद खान रा. बाबुपेठ यांना अटक करण्यात आली.

सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क ५४३/२०२० कलम ३७९,१८८,३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरच्या गुन्हयात एक जेसीबी मशीन क. एमएच ३४ एपी ३४३३ की. १५,००,०००/-रू, एक हायवा ट्रक क. एमएच३४ एम ३६६४ किं.१०,००,०००/-रू, 32 ब्रॉस रेती किं. ७७,५००/-रू असा एकुण २५,७७,५००/-रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असुन पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श् शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनात पोनि. रामनगर श्री. प्रकाश हाके यांचे नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.

या रेती तस्करीत वाहनचालकांना अटक केली असली तरी वाहन मालकांवर प्रशासनाने कारवाई करून आजपर्यंत जी रेती त्या घाटावरून चोरी झाली त्याचं मोजमाप करून संपूर्ण दंड वाहन धारकाला भरायला लावून अटक करावी, कारण या प्रकरणात आरोपीना मोठं राजकीय बळाचे पाठबळ आहे.

आता पोलीस या संपूर्ण प्रकारावर काय कठोर कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे, कारण वाळू माफियांची मोठी चैन जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here